तिसरा दिवस उजाडला. डेहणे गावातील प्रसन्न सकाळ. कालच्या गुयरीच्या दाराने फारच दमछाक केली होती. पायांवर बऱ्यापैकी ताण आला होता. पण रात्रीच्या सुखद झोपेमुळे टवटवीत होत करवली घाट चढण्यास सज्ज होतो. काही जणांनी काही कारणास्तव मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. काही जणांना घाट चढण्यास तयार केलं. चहा पोहे चा कार्यक्रम आटपत डेहणे छावणीचा निरोप घेतला. काही छावणी लीडर्स सोबत होते. डांबरी सडकेने चालण्यास सुरूवात केली. भल्या थोरल्या आजोबानं दर्शन दिलं. बरेच ट्रेकर्स वाल्मिकी आश्रमापर्यंत जातात ते डेहणे गावातूनच. काल कुमशेत मधून केला तो आजा पर्वत माथा. कच्च्या सडकेवर आलो. रतनगड व खुट्टा डोक वर काढत होते. सोबत जाणते ट्रेकर संजय जोशी काका होते. त्यांच्यासोबत गप्पा मारत पाय चालत होते. त्यांच्यावेळच ट्रेकिंग व आताच बदललेल ट्रेकिंग यावर गप्पा चालल्या होत्या. बराच अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ते इतके नशीबवान कि गोनीदा त्यांना त्या काळी अनेक गडकिल्ल्यांवर भेटले. आणि गोनीदांकडून गडकिल्ल्यांचं वर्णन ऐकण त्याहून दुसरं सुख काय असणार? वाटेत नदीचं पात्र पार कराव लागतं. मागे पावसात आलो तेव्हा पाण्याचा प्रवाह फारच होता. तेव्हा दुथडी भरून वाहणारी ही नदी आज फक्त तळाचे दगड गोटे दिसत होते. खडखडाट. पाहून मन विषण्ण झालं.
कोकणातल्या नद्यांच तसचं पावसात दुथडी भरून वाहणार त्यानंतर खडखडाट. असो. नदीपर्यंत सोडायला आलेल्या डेहणे कँप स्वयंसेवकांचा निरोप घेतला. व पुढे निघालो. नदीच्या काठाकाठाने जाणारी वाट. फुलत जाणारी सकाळ. मंद गार वारा शरीरास हवाहवासा वाटणारा एकूणच प्रसन्न करणारा माहोल. रानातली वाट. याआधी हि वाट केल्यामुळे ओळखीची वाटत होती. फक्त पावसात पुरूषभर उंचीच्या माजलेल्या गवतातून वाट काढायची एवढाच काय तो फरक.कानी गुंजणारा पाखरांचा किलबिलाट सोबत होताच. पुढून एक ट्रेकर्सचा ( म्हणणं वावग ठरेल कदाचित) समूह मोबाईलच्या दणदणीत आवाजासहित येत होता. सांधण मारून आले होते कदाचित. मनात प्रश्न आला शहरात राहिलेल्या माणसाला शांतता सहन होत नाही का? गोंगाटाची इतकी सवय झालेय का? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. ट्रेकिंग फोफावतय हि गोष्ट चांगली आहे. पण जबाबदारपणाची कुठेतरी उणीव भासते. आमच्या बोलण्याने त्यांनी बंद केलं खरं. असो. पुढच्या टप्प्यावर सह्याद्रिचा एक भव्य नजारा समोर आला. उजवीकडे आकाशात झेपावलेला बाण सुळका मागे खुट्टा व रतनगड.
खुट्टा सुळका व सुटावलेला बाण सुळका
|
थोडं अंतर कापताच एका बाजूला काळाकभिन्न साम्रदकडा. या कड्यावरून पावसात पाणी असं काही कोकणात झेपावत ही हे दृश्य त्याचा रोरावणारा आवाज कानात साठवत पहात रहाव. ओढा पार करत साम्रद दिशेत निघालो. एक वाट बाण सुळक्याकडून सांधण दरीत जाते. आम्हाला साम्रद घळीत जायचं होतं. डावीकडची वाट धरली. खडी चढण चढत पहिल्या कातळटप्प्यावर आलो. दोराची गरज भासली नाही.( पावसात लागतो). पाण्याच्या ठिकाणी क्षणभर विश्रांती झाली. इथून पुढे मात्र खडा चढ. मागे वळून पाहीलं तर आजा पर्वत धीरगंभीरपणे पहात होता. सीतेचा पाळणा सुळकाही खूलून दिसत होता.
वाटेवर सावली असल्याने झपझप चालत होतो. एक अर्ध्या तासात दुसरा कातळटप्पा उभा ठाकला. याला व्यवस्थित होल्ड्स आहेत. तरीही काळजी घेत चढावं.
वर चढत डावीकडे वळत पठारावरून साम्रदची वाट धरली. पुन्हा रतनगडाने व पुढे AMK रांगांनी दर्शन दिलंच. गाव नजरेच्या टप्प्यात आलं. घरं दिसू लागली. पर्यटकांच्या गाड्यांची गर्दी होती. जणू काही साम्रदला जत्रेचं स्वरूप आलं होतं. तीन चार वर्षापूर्वीच साम्रद आता खूपचं बदललय. गावकऱ्यांच्या हाती रोजगार आलाय. विकास होतोय. पण जाणीवपूर्वक पर्यटन नक्कीच झालं पाहिजे.
साम्रदला लवूच्या घरी पाहूणचार झाला. इथून पुढे घाटघरचा प्रवास. कधीही कुठेही कुणाचीही फिरकी घेणाऱ्या बोलक्या अनिता काकू व काही सहकारी मुंबईत परतणार होते. त्यांची उणीव नक्कीच भासणार होती. घाटघरकडे चालत निघालो. मध्ये जंगलवाट. पूर्ण वाटेवर अलंग मदन कुलंग हे त्रिकुट मनास भावत होत. त्यानंतर पक्की सडक पुन्हा जंगल परत सडकेवर. चालताना भाऊंनी एक सुंदर अस सौन्दर्य स्थळ दाखवलं ते म्हणजे उंबरदरा मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर. येथून कोकणातल्या घाटघरच्या धरणाचं अफलातून दृश्य दिसत. याच भागातून चोंढ्या घाट थेट कोकणात उतरतो.
इथून बाहेर पडत घाटघरची वाट धरली. वाटेत आणखी एका सौन्दर्यस्थळाने स्वागत केलं. घाटघर धरण. सह्यरांगांनी वेढलेला असा हा घाटघर जलाशय. धरणाचं पसरलेलं शांत निळंशार पाणी. मागे अलंग मदन कुलंगची रांग. त्यांचं पाण्यात पडलेलं लोभसवाणं प्रतिबिंब. पाय हलेचनात जागचे.
वाटेवर सावली असल्याने झपझप चालत होतो. एक अर्ध्या तासात दुसरा कातळटप्पा उभा ठाकला. याला व्यवस्थित होल्ड्स आहेत. तरीही काळजी घेत चढावं.
दुसरा कातळटप्पा |
वर चढत डावीकडे वळत पठारावरून साम्रदची वाट धरली. पुन्हा रतनगडाने व पुढे AMK रांगांनी दर्शन दिलंच. गाव नजरेच्या टप्प्यात आलं. घरं दिसू लागली. पर्यटकांच्या गाड्यांची गर्दी होती. जणू काही साम्रदला जत्रेचं स्वरूप आलं होतं. तीन चार वर्षापूर्वीच साम्रद आता खूपचं बदललय. गावकऱ्यांच्या हाती रोजगार आलाय. विकास होतोय. पण जाणीवपूर्वक पर्यटन नक्कीच झालं पाहिजे.
साम्रदला लवूच्या घरी पाहूणचार झाला. इथून पुढे घाटघरचा प्रवास. कधीही कुठेही कुणाचीही फिरकी घेणाऱ्या बोलक्या अनिता काकू व काही सहकारी मुंबईत परतणार होते. त्यांची उणीव नक्कीच भासणार होती. घाटघरकडे चालत निघालो. मध्ये जंगलवाट. पूर्ण वाटेवर अलंग मदन कुलंग हे त्रिकुट मनास भावत होत. त्यानंतर पक्की सडक पुन्हा जंगल परत सडकेवर. चालताना भाऊंनी एक सुंदर अस सौन्दर्य स्थळ दाखवलं ते म्हणजे उंबरदरा मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर. येथून कोकणातल्या घाटघरच्या धरणाचं अफलातून दृश्य दिसत. याच भागातून चोंढ्या घाट थेट कोकणात उतरतो.
उंबरदरा |
इथून बाहेर पडत घाटघरची वाट धरली. वाटेत आणखी एका सौन्दर्यस्थळाने स्वागत केलं. घाटघर धरण. सह्यरांगांनी वेढलेला असा हा घाटघर जलाशय. धरणाचं पसरलेलं शांत निळंशार पाणी. मागे अलंग मदन कुलंगची रांग. त्यांचं पाण्यात पडलेलं लोभसवाणं प्रतिबिंब. पाय हलेचनात जागचे.
घाटघर जलाशय |
थोड्याच वेळात घाटघर गावात पोहोचलो. धरणग्रस्तांसाठी वसवलेल सुंदर अस नियोजित टुमदार गाव. घाटघर छावणीवर विंदा काकू, मानसी इ . स्वागतासाठी तयार होते. रहाण्याची व्यवस्था एकनाथकडे करण्यात आली होती. रात्री गम्मत जम्मत कार्यक्रमात सुशील सरांनी खेळाच्या माध्यमातून ट्रेकिंग आणि व्यवस्थापनाचे धडे दिले. बऱ्यापैकी गारठा होता. आज जेवणासाठी भाकरीचा बेत होता. जेवण झाल्यावर गप्पा मारत गावातून एक फेरफटका झाला. तिसऱ्या दिवसाची सांगता करत झोपी गेलो.
करवली/करोली घाट
पायथ्याचं गाव: डेहणे
घाटमाथ्यावरच गाव: साम्रद
श्रेणी :मध्यम
लागणारा कालावधी: ५ ते ६ तास
आभार: चक्रम हायकर्स
क्रमश:
This comment has been removed by the author.
ReplyDeleteउत्तम लेखन आणि सुंदर छायाचित्रण
ReplyDelete