Wednesday, January 31, 2018

मंतरलेले पाच दिवस (सह्यांकन २०१७) भाग २ रा





तिसरा दिवस उजाडला. डेहणे गावातील प्रसन्न सकाळ. कालच्या गुयरीच्या दाराने फारच दमछाक केली होती. पायांवर बऱ्यापैकी ताण आला होता. पण रात्रीच्या सुखद झोपेमुळे टवटवीत होत करवली घाट चढण्यास सज्ज होतो. काही जणांनी काही कारणास्तव मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. काही जणांना घाट चढण्यास तयार केलं. चहा पोहे चा कार्यक्रम आटपत डेहणे छावणीचा निरोप घेतला. काही छावणी लीडर्स सोबत होते. डांबरी सडकेने चालण्यास सुरूवात केली. भल्या थोरल्या आजोबानं दर्शन दिलं. बरेच ट्रेकर्स वाल्मिकी आश्रमापर्यंत जातात ते डेहणे गावातूनच. काल कुमशेत मधून केला तो आजा पर्वत माथा. कच्च्या सडकेवर आलो. रतनगड व खुट्टा डोक वर काढत होते. सोबत जाणते ट्रेकर संजय जोशी काका होते. त्यांच्यासोबत गप्पा मारत पाय चालत होते. त्यांच्यावेळच ट्रेकिंग व आताच बदललेल ट्रेकिंग यावर गप्पा चालल्या होत्या. बराच अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ते इतके नशीबवान कि गोनीदा त्यांना त्या काळी अनेक गडकिल्ल्यांवर भेटले. आणि गोनीदांकडून गडकिल्ल्यांचं वर्णन ऐकण त्याहून दुसरं सुख काय असणार? वाटेत नदीचं पात्र पार कराव लागतं. मागे पावसात आलो तेव्हा पाण्याचा प्रवाह फारच होता. तेव्हा दुथडी भरून वाहणारी ही नदी आज फक्त तळाचे दगड गोटे दिसत होते. खडखडाट. पाहून मन विषण्ण झालं. 

मंतरलेले पाच दिवस (सह्यांकन २०१७)भाग ३ रा

सह्याद्रीचे रांगडे गडी


पहाटे पाच ला गजर वाजला. गारठ्यामुळे स्लिपिंग बँगच्या बाहेर पडावस वाटत नव्हत. बाहेर आलो. सुटलेला गार वारा बोचकारत होता. कुडकुडत सगळी कामं आटपत घाटघर छावणीचा निरोप घेत कुलंगकडे प्रस्थान केलं. बऱ्यापैकी फटफटल होतं. पूर्वेस नारायणरावांची वर येण्याची घाई. विहीरीवर बायांची लगबग.

Wednesday, January 3, 2018

मंतरलेले पाच दिवस (सह्यांकन २०१७) भाग १ला

पाथरा  घाट -आजा पर्वत माथा-गुयरीचा दरा 

विजयादशमी झाली आणि वेध लागले ते सह्यांकनचे. चक्रम हायकर्सच सह्याकन म्हणजे पाच दिवस  शिस्तबद्ध निसर्गाचा आस्वाद घेत सारे नियम पाळत केली जाणारी भटकंती. नाव लगेच नोंदवून टाकलं. डिसेंबर मध्ये होणाऱ्या या भ्रमंतीचा मार्ग खडतर होता
गुंडे गाव ( कोकण ठाणे जिल्हा) - पाथरा घाट- आजा पर्वत माथा(कुमशेत)-गुयरीचं दारा -डेहणे(कोकण)-करवली घाट-साम्रद-घाटघर(नगर जिल्हा)-कुलंग गड-छोटा कुलंग-गाढव घाट-लाधेवाडी (कोकण ठाणे जिल्हा)
आतुरतेने वाट पाहत प्रस्थानाचा दिवस उजाडला. दुसरी बँच हळूहळू चक्रम ऑफिसजवळ जमू लागली.  थोड्याच वेळात बस निघाली गुंडेच्या दिशेने. रात्री दोनच्या सुमारास गावात आगमन झालं. एवढ्या रात्री देखील लांबा(विनय नाफडे सर),प्रणव ही टिम स्वागतास तत्पर होती. घराच्या अंगणात पथारी पसरली. व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पाचलाच जाग आली. सर्व विधी आटपत गरमागरम पोहे ढकलले. पाथरा घाट बऱ्यापैकी खडतर असल्याने भरपेट नाश्ता केला गेला. सगळ्या मुखड्यांची ओळख परेड झाली. वॉर्म अप झालं. तांबड बऱ्यापैकी फुटत होत.