Tuesday, August 1, 2017

वर्षासैर घाटवाटांची (वाघजाई व सवाष्णी घाट )

आषाढातलं कुंद वातावरण निवळून नुकताच श्रावण सुरू झालाय. आषाढात धोधो बरसणारा आता रिमझिम झालाय. हा बरसणारा घननिळा आणि रेशीमधारा अनुभवण्यासाठी सह्याद्रीच्या वाकड्या वाटेला जावं. सध्य वातावरण पाहता किल्ल्यांवर  पिकनिक फेम गर्दी वाढलेय. ती टाळून काही ऑफबीट मिळत का ते पाहत होतो. तोच अरूण सरांचा वाघजाई सवाष्णी घाट प्लान पाहीला.जायचं ठरलं. तश्या पावसात घाटवाटा करणं म्हणजे जिकिरीचंच काम. पण निघालो. अरूण सर काही कारणास्तव येऊ शकले नाहीत.  सद्या दळणवळणाची साधनं बऱ्यापैकी झाल्याने या घाटवाटा काहीश्या पुसट होत चालल्या आहेत. आम्हा भटक्यांना मात्र या कोकणातून घाटमाथ्यावर चढणाऱ्या वा उतरणाऱ्या घाटवाटांचं कायम आकर्षण असतं.